मिशन 500 कोटी लिटर जलसाठा आजचा प्रेरणादायी फोटो
आजचा प्रेरणादायी फोटो
शेतकरी गोपीचंद मोहन चव्हाण
राहणार गोरखपुर तांडा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव गट क्रमांक 105
यावर्षी पाटणादेवी चंडिकावाडी डोंगराळ परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला गाव च्या तीतूर नदीला एक नाही तर सात वेळा महापूर आला यात शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले जमीन भुईसपाट झाली गुरेढोरे, झाडे, कुक्कुटपालनातील पक्षी, शेती अवजारे, घरे, सर्व पूरा सोबत शिवारातील वाहून गेली होत्याचे नव्हते झाले शेतकरी जवळ फक्त राहिले डोळ्यात पाणी झाले कधी न पाहिलेला पाऊस हा यंदा पाहायला मिळाला त्या बद्दल काही माहिती नव्हती ना प्रशिक्षण पावसाची नोंद शंभराच्या पुढे झाली शेतकरी पुरता उद्वस्त झाला. त्यात पंचनामे नुकसान पातळी ची टक्केवारी यात हवालदिल झाला शेतकऱ्यांना मदत व्हावी शेतकऱ्यांची पुन्हा शेती मध्ये घडी बसवावी पीक पुन्हा जोमाने यावे यासाठी राजेश वाडीलाल राठोड यांनी पुढाकार घेऊन गोरखपूर तांडा गावात तितूर नदीतला गाळ काढण्याचे काम मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा व रोटरी क्लब ऑफ चेंबुर यांच्या संयुक्त विद्यमाने कामाचे 19 /4/2022 ला उटघाटन कामाला सुरुवात झाली ईश्वर राठोड हल्ली मुक्काम पालघर या युवकाने पंधरा दिवस सुट्टी काढून गावासाठी मिशन च्या माध्यमातून कामासाठी आला सुरुवाती स्वतःपासून केली व स्वतः मशीनच्या साहाय्याने चाळीस तास काम केले लोकांना प्रोसाहीत केले गाळ हा आपल्या शेतात टाकल त्यांचेच अनुकरण करू संजय चव्हाण शेतकऱ्यांनी पन्नास तास मशीन चालवणे नदी गाळ काढून शेतामध्ये टाकला शेतकरी गोपीचंद मोहन चव्हाण यांनी आठ दिवस मिशनच्या कामाची पाहणी केली व मिशन हे खर च शेतकऱ्यांसाठी कामाचा केंद्रबिंदू हे खात्री झाली व त्यांनी आपल्याजवळ आज पत्नीचे दागिने गहाण ठेवून दहा हजार रुपये डिझेल आणले हे ऑपरेटर सचिन राठोड यांनी मला सांगितले मी पूर्णपणे भारावून गेलो माणसाची वेळ कितीही वाईट असली तरी आपले विचार हे मोठे असावे जीवन हे सकारात्मक दृष्टीने जगले पाहिजे किंवा जीवनात कितीही संकटे असल यातून मार्ग निघेल व आज गोपीचंद मोहन चव्हाण यांनी कृतीतून दर्शवली निसर्गाने झालेली हानी भरून काढण्यासाठी मिशन 500 कोटी लिटर जलसाठा हे एक गरीबातला गरीब घरी शेतकरी साठी वरदान आहे मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा मध्ये 60% शेतकरी वाटा आहे व 40% मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा व पाच पाटील टीम यांचा वाटा आहे आज गोपीचंद मोहन चव्हाण आणि टाकलेला विश्वास व टाकलेला पैसा त्यांना येत्या खरीप हंगामात शेती उत्पन्ना रुपी नक्की मिळेल याची नक्की हमी आहे हे सर्व मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अनुभवातून प्रात्यक्षिक तून सांगत आहे डॉ उज्वल कुमार चव्हाण व मिशन पाचशे कोटी लिटर पाच पाटील टीम यांच्या कामावर विश्वास ठेवला जो शेतकरी जीवनात दिवसेंदिवस अडचणी आहेत पण त्यावर मात करण्यासाठी उपाय पण आहेत आपले रडणे आपले दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा त्यावर मार्ग पण शोधला आहे आज शेतकरी गोपीचंद मोहन चव्हाण यांनी शोधला खरंच जीवन किती अडचणीचे असले त्यावर मार्ग शोधता येतात हे गोपीचंद मोहन चव्हाण यांनी यांनी आपल्या कृतीतून सांगितले एक प्रेरणादायी विचार सर्वांपुढे ठेवला
शेवटी कुसुमाग्रज यांच्या कवितेच्या ओळी आठवतात
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त लढ म्हणा🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रा किरण मुरलीधर पाटील
पाच पाटील मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा


Comments
Post a Comment