Skip to main content

9 एप्रिल जलसंधारण दिवस निमित्तानेपाणी एक वैश्विक समस्या त्यावर उपाय मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा योजना




पाणी आडवा पाणी जिरवा👍👍

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज जलसंकट
 हे जगासमोर भेडसावणारी मोठी समस्‍या बनली आहे. “पाणी” निसर्गाने आपल्‍याला दिलेली अमुल्‍य भेट आहे. परंतु पाण्‍याचा जपुन वापर न केल्‍यामुळे मानवजाती पुढे जलसं‍कट उभे ठाकले आहे . याच्‍यासाठी समाजात,शाळा,महाविद्यालयामध्‍ये पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्‍पनेचे महत्‍व पटवुन जनजागृती केली गेली पाहीजे. 
सर्व प्राणिमात्रांच्या जीवनात पाणी हे फार महत्त्वाचे आहे. पाणी म्हणजे जीवन. पण शहरातील लोकांना पाण्याची किंमत कळत नाही. ते लोक पाणी जपून वापरत नाहीत. खूप पाणी वाया घालवतात. खेड्यापाड्यांतील स्त्रियांना दूर अंतरावरून पाणी वाहून आणावे लागते. त्यांचे कष्ट लक्षात घेतले पाहिजेत. उन्हाळ्यात नदया, विहिरी आटतात. त्या वेळी लहानशा वाटीने खड्ड्यातील पाणी भरणारी मुले पाहिली की, जीव तडफडतो.
पाणी ही निसर्गाची देणगी आहे. त्यामुळेच माणसाला त्याची किंमत कळत नाही. पाण्याची टंचाई ही आता जगभर निर्माण झाली आहे. कारण जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी फार खाली गेली आहे. माणसाने जंगले नष्ट केली, बांधकाम केले. त्यामुळे जमिनीत जेवढे पाणी मुरायला हवे, तेवढे मुरत नाही. म्‍हणुन पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्‍पनेवर भर दिला गेला पाहीजे.
प्रयोगशाळेत पाणी बनविता येते परंतु सर्वांची गरज पुरवेल इतके नक्कीच नाही. आज जगात पाण्यावरून संघर्ष पेटलेले दिसतात.  क्योटो इथे झालेल्या  जागतिक जलपरिषदेतील अहवालात हा इशारा देण्यात आला आहे  की या पुढील युद्धे ही पाणी वाटपाबाबत किंवा पाण्याच्या तुटवड्यावरून होतील.  आपल्या सर्वांचा प्रमुख जलस्रोत म्हणजे 'पाऊस' ज्याचे अनिश्चित आगमन, उपलब्धी प्रमाण ही समस्या सतत भेडसावत  असते.
त्यामुळे पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन ही समस्या दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत चालली आहे. पाणी, लोकसंख्या आणि जमीन यांचा त्रिकोण जमविणे आवश्यक आहे.  युनिसेफने महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांच्या जलसर्वेक्षणाबाबत दिलेल्या अहवालात  या राज्यांना पिण्याच्या पाण्याची व उपलब्धतेची प्रमुख टंचाई भासण्याचा इशारा दिला आहे.
समस्यांचे मूळ कारण म्हणजे वाढते उद्योगीकरण, लोकसंख्येचा भस्मासुर, जंगलाची अवैध तोड यामुळे जलचक्राचे नियमन, पर्यावरणाचे संतुलन, वन्य प्राण्यांची कमी होणारी संख्‍या इ. समस्या ठळक रूपाने स्पष्ट होऊ लागल्या. पूर व दुष्काळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
भारताचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान व प्रचंड जीवितहानी दरवर्षी होत असते. भू-गर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा होत आहे. त्यामुळे ४०० फुटापर्यंतसुद्धा कूपनलिका कोरड्या ठणठणीत असतात. पुरोगामी महाराष्ट्रात ७५ तालुके अवर्षण प्रवणग्रस्त आहेत. दिवसेंदिवस हा आकडा फुगतच चालला आहे.
 यासाठी आवश्यक आहे ती आत्मविश्वास, एकोपा व दृढनिश्चयाची. जलसमस्या ही शासनाची नसून माझी आहे. माझ्या गावाची आहे याची जाणीव होणे गरजेचे आहे. पुढील प्रत्येक विकास कार्यात जनतेला सहभाkगी करून घेणे क्रम प्राप्त ठरेल आणि जनतेचा पुढाकार व शासन त्यात सहभागी या धोरणाचा अवलंब केला पाहिजे
समाजसेवक अण्णा हजारे, डॉ. विलासराव साळुखे, राजस्थानचे जोहडवाले (पाणीवाले) डॉ. राजेंद्र सिंग यांनी तसेच चाळीसगाव तालुक्यातले डॉक्टर उज्वल कुमार चव्हाण इडी जाईन्ड कमिशनर मुंबई यांनी मिशन 500 कोटी जलसाठा अंतर्गत पोकलेन मध्ये डिझेल टाका व मशीन वापरा पोकलेन द्वारे नाला खोलीकरण रुंदीकरणाची सर काढणे बांध बंदिस्त करणे विहीर पुनर्भरण बांधांवर बांबूची झाडे लावणे पांदण रस्ते ही  कामे संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे शेतकरी या कामाचा केंद्रबिंदू असून आतापर्यंत मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा मधून दोनशे आठ कोटी लिटर जलसाठा हा झाला आहे हे काम फक्त चार वर्षे झाले मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा यशस्वी करण्यासाठी पाच पाटील टीम गाव प्रमुख गाव समन्वययांनी मोलाचे कार्य दिली आहे म्हणून हे  आपल्यासमोर आदर्श उभे केले आहोत. जलसाक्षरता चळवळ वाडी वस्तीवर पोहोचवून पाण्याचे  जतन म्हणजे पाण्याची निर्मिती या सूत्राचा प्रचार केला पाहिजे. जलसंवर्धन व जलसंरक्षणासाठी केलेले कायदे याबरोबर जनसहभाग वाढलाच पाहिजे. किंबहुना जनसहभाग हा जलसंवर्धनाचा मूलमंत्रच आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्‍याच बरोबर पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना सवोच्‍च महत्‍व देऊन राबवली गेली पाहीजे तरच जलसंवर्धन होण्‍यास मदत होईल. 
वरील लेख आपल्‍याला समजुन येईल जलसंकट किती भिषण समस्‍या आहे व त्‍यावर कोणत्‍या उपाययोजना केल्‍या पाहीजेत. तुम्‍हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा तसेच जलसंवर्धन आणि पाणी अडवा पाणी जिरवा हे धोरण संपुर्णपणे यशस्‍वी करण्‍यासाठी व जनजागृती करण्‍यासाठी एक शेअर जरूर करा.

 या लेखाबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा 


Comments

Popular posts from this blog

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ निकाल

Hsc Result 2025

Buffer Solution