मोठी बातमी!! 15 जून पर्यंत राज्यात 7 हजार पदांची पोलीस भरती!! – Police Bharti 2022

राज्यातील अनेक तरुण, तरुणी पोलीस भरतीची वाट पाहत आहेत. मैदानी चाचणी, लेखी परीक्षेची जोरदार तयारी करत आहेत. परंतू राज्य सरकार तारखा कधी जाहीर करणार, पोलीस भरती प्रक्रिया कधीपासून राबविली जाणार आदी बाबत काहीही माहिती मिळत नव्हती. यावर राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटलांनी मोठे वक्तव्य केले आहे.
राज्यात ५०००० पोलीस पदे रिक्त आहेत. सध्या सात
हजार मुलांची भरती पूर्ण होत आली आहे. सात हजार पदांची भरती काढली जाणार आहे. जूनच्या १५ तारखेपासून ही प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. यानंतर राज्य मंत्रिमंडळासमोर आणखी १५ हजार पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे, असे वळसे पाटील म्हणाले. ही मोठी भरती करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ नक्कीच परवानगी देईल. पोलिसांवर खूप ताण आहे, तो कमी करण्यासाठी ही भरती गरजेची असल्याचे वळसे पाटील म्हणाले.

Comments
Post a Comment