मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अंतर्गत चाळीसगाव तालुक्यात दोन नद्या झाल्या पुनर्जीवित👍👍
मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा च्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यात दोन नद्या झाल्या पुनर्जीवित 👍
भारतात दिवसेंदिवस लोकसंख्याही वाढत आहे गरज ही शोधाची जननी आहे या लोकसंख्येत दररोज भरपूर गोष्टींची गरज भासते त्यानिमित्ताने नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागत आहे आज आपण भारत मध्ये पाहिले तर औद्योगिक वसाहत, कॉंक्रिटीकरण, वाहनांचा अतिरेक वापर,रासायनिक खतांचा बेसुमार वापर, या सर्वांमुळे जैवविविधतेत बदल हे घडून येत आहे यावर्षी 47.7 एवढे जास्त तापमान महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात नोंदवल्या गेला याचा फटका मानवाला होत आहे आपल्या गरजा भागवण्यासाठी मनुष्य हा नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर बेसुमार करत आहे यामध्ये पाणी, जंगल तोड,मातीचा, इंधन, खाणी याचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहे पुरेसा पाऊस नसल्यामुळे वाढती लोकसंख्या यामुळे राहण्याचा प्रश्न नागरिक वस्तीला होत आहे त्यामुळे शहरातून जाणाऱ्या नद्या यावर अतिक्रमण होऊन मनुष्य यावर आपले घर बांधत आहे तसेच खेडेगावात नदीवर अतिक्रमण करून आपली शेती शेतकरी करत आहे व नदी ही संकल्पना तो नष्ट करू पाहत आहे आज भारतात जवळ जवळ सात हजारहून अधिक नद्या संपुष्टात आलेले आहेत काही मानवाच्या हस्तक्षेपामुळे तर काही निसर्गाच्या संतुलन बिघडल्यामुळे याला सर्व जबाबदार मनुष्य आहे.. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी खूप मोठा दुष्काळ तर कधी महापूर यासारख्या नैसर्गिक संकटांना माणसाला दोन हात करावे लागतात यात वित्तहानी, जीवित हानी होतेच पण निसर्गाची हानी ही न भरून निघण्या सारखे आहे अशाच प्रकारे नद्या मृत होऊ नयेत व आपल्या निसर्ग साधन संपत्ती ला हानी पोचू नये असाच ध्यास घेतलेले डॉक्टर उज्वल कुमार चव्हाण, ईडी जॉईंट कमिशनर मुंबई यांच्या संकल्पनेतून मिशन पाचशे कोटी लीटर जलसाठा व पाच् पाटील टीम गावागावात जाऊन तीस शेतकऱ्यांचा ग्रुप बनवते नाला खोलीकरण, रुंदीकरण, बांधबंदिस्ती,वृक्षलागवड,विहीर पुनर्भरण यासारखे जलसंधारणाचे निसर्गाच्या कामांसाठी शेतकऱ्यांना एकत्रित आणत व गावात मन संधारण करून 30 शेतकरी एकत्र कामे करून घेतात यात शेतकरी वर्ग हा डिझेलचा खर्च करतो व सेवाभावी संस्था पोकलेन मशीन जेसीबी यांच्या खर्च उचलतो तब्बल चाळीसगाव तालुक्यात ही योजना 36 गावांमध्ये पोहोचले आहे यातून 208 कोटी लिटर जलसाठा हा एकट्या चाळीसगाव तालुक्यात झाला आहे यात शेतकरी हा केंद्रबिंदू असून 60 टक्के खर्च शेतकरी उचलतो व 40 टक्के खर्च सेवाभावी संस्था या करत असतात या कमालीच्या सूत्रांमुळे आज हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात भर राबविला जात आहे. याची दखल वेळोवेळी प्रशासनाने दखल घेऊन मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा व पाच पाटील टीम चा सन्मान केला आहे याच वेळेस चाळीसगाव तालुक्यातील मुख्य दोन नद्या आहेत पहिली बेलगंगा व दुसरी तितुर या दोन्ही नद्या मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अंतर्गत डॉक्टर उज्वल कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने पुनर्जीवित करण्यात आल्या वर्ष 2019- 20 बेलगंगा नदी ही देऊळी या गावापासून थेट गिरणा नदी पर्यंत ( देवळी चिचखेड,दड पिंपरी, दसे गाव, मेहूणबारे ) ही करण्यात आली या नदीत बेसुमार असे काटेरी झुडपे,लव्हाळी, कुंदा, नागिन, पानफुटी वनस्पती होते या सर्व नदीतून ही घाण काढून त्यातला गाळ हा स्वतः शेतकरी वर्गाने उभे राहून आपल्या शेतात वाहून घेतला व नदी ही स्वच्छ करण्यात आली ज्या नदीत जवळ कोणी जाऊ शकत नव्हते उग्र प्रदूषित झालेली होती त्यात आता पाणी साठते व नदीमध्ये जैवविविधता वाढू लागली आहे पान कोंबडी, मोर, वटवाघुळ, ससे यासारखे पशुपक्षी दिसू लागले आहेत पक्षांचा किलबिलाट व आदिवासी लोकांना नदीमध्ये मासेमारी करण्यासाठी एक रोजगार उपलब्ध झाला आहे
अशीच चाळीसगावातील दुसरी मुख्य नदी तितुर तिचा उगम पाटणादेवीच्या सातमाळा परिसरातून झाला आहे मागील वर्षी 2021 या नदीला डोंगरी ही उपनदी आहे डोंगराळ भागात भरपूर पाऊस झाल्याने तब्बल सात वेळा पूर या नदीला आला यात जीवित हानी वित्तहानी भरपूर मोठ्या प्रमाणात झाली लोकांच्या अतोनात नुकसान झाले. या पुरापासून खूप मोठा धडा शहरवासीयांनी घेतला व मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा डोंगरा जवळील गावे शिवापुर येथे महापुराच्या मुळे फुटलेल्या बंधाऱ्यांची कामेही करण्यात आली यात शेतकरी वर्गाचे शेतीचे बांधबंदिस्ती नाला खोलीकरण,रुंदीकरण, केटीवेअर बांधणीचे कामे करण्यात आली
त्यापुढील गाव गोरखपुर तांडा येथेही शेतकऱ्यांची पुरामुळे नुकसान झालेल्या कामेही करण्यात आली वाहत्या पाण्याला अटकाव करण्याचे काम या दोघी गावात करण्यात आले
यांच्या माध्यमातून पुढे मिशन पाचशे नदी स्वच्छता हा योजना राबविण्यात चे ठरविले यात मिशन पाच पाटील टीम, नगरपालिका प्रशासन, सायकलिंग ग्रुप, नारायण भाऊ अग्रवाल ग्रुप, एच एच पटेल ग्रुप यांच्या दातृत्व ने पोकलेन मशीन मध्ये डिझेल खर्च करण्यात आला व जवळजवळ सहा पोकलेन मशीन च्या साह्याने चार टप्प्यात नदी स्वच्छता करण्यात आली यातून नऊशे डंपर गाळ हा नदीपात्रातून काढण्यात आला व जी तितुर नदी प्रदूषित काटेरी झुडूप ग्रस्त व सांडपाणी साचल्याने उग्र वास येत असल्याने खराब झालेली होती ती पुन्हा वाहू लागली व चाळीसगाव वासियांना गेलेले नदीतील नैसर्गिक गतवैभव मिळाले असा आभास झाला व सर्व नदीकाठी नागरिक खुश झाले व नगरपालिका प्रशासन पुन्हा नदीमध्ये कचरा व घाण होणार नाही याची दक्षता घेत आहे.. अशा एक आशावादी पर्यावरणवादी समाजवादी अधिकारी डॉक्टर उज्वल कुमार चव्हाण यांच्या संकल्पनेने मिशन 500 कोटी लिटर जलसाठा व पाच पाटील टीम चाळीसगाव तालुक्यातील दोन नद्या पुनर्जीवित झाल्या
शब्दांकन
प्रा किरण पाटील
मिशन 500 पाच पाटील
Comments
Post a Comment