डॉ श्री उज्ज्वल कुमार चव्हाण IRS: एक सामाजिक भान असलेले संवेदनशील अधिकारी
डॉ उज्वल कुमार चव्हाण IRS: एक सामाजिक भान असलेला संवेदनशील अधिकारी
*सामैव हि प्रयोक्तव्यमादौ कार्यं विजानता*
*सामसिद्धानि कार्याणि विक्रियां यान्ति न क्वचित्*
अर्थ आपल्या माध्यमातून काम चांगले कसे करावे हे जाणणाऱ्याने पहिल्यांदा गोड बोलून समजावून सांगावे. अशाप्रकारे सामाजाचा उपयोग करून पूर्ण केलेली कामे कधीही बिघडत नाहीत. या सुभाषितनुसार मिशन 500 कोटी लिटर जलसाठा यांच्या अंतर्गत डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यातील गावागावात पाण्याची मशाल पेटवली व आपले गाव दुष्काळमुक्त कसे राहील हे लोकांना पटवून दिले गावात जलसंधारणाची कामे करून घेते नुसते बोलून नाहीतर करून दाखवले आज डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांनी मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा ही संकल्पना मांडली त्यातून पाच पाटील टीम ही उभारणी केली व प्रत्येक पाच पाटील ला पाच गावांची जबाबदारी देऊन गावात जलसंधारणाची कामे उभारली डॉक्टर उज्ज्वलकुमार चव्हाण हे रविवारी चाळीसगाव ला येऊन पाच पाटील टिम यांना व्यक्तिमत्व विकास यावर प्रशिक्षण दिले व त्यांना छोटे छोटे स्वाध्याय देऊन त्यावर काम करून घेतले, उदाहरणार्थ प्रामाणिकपणा, आपली गावात सकारात्मक भूमिका, विश्वास संपादन करणे, दिलेला शब्द पाळणे, वेळेचे बंधन रोजनिशी लिहिणे एका दिवसाचे काम, आठवड्याचे काम महिन्याभराची काम कोणते या सर्व बाबींवर त्यांनी आम्हा सर्व पाच पाटील टीम कामे करायला लावले याचं आपल्या जीवनावर काय बदल झाला व आपला जीवन प्रवास सुखकर होण्यासाठी विविध पुस्तके वाचण्यास सांगितले या पुस्तकातून आपण काय शिकलो हे सांगितलं आपली भूमिकाही इतरांपेक्षा वेगळी आहे व आपण इतरांपेक्षा वेगळे करत आहोत पुढील पिढी वाचवण्यासाठी,निसर्गा साठी काम करत आहे हे त्यांनी आमच्या मनात बिंबवली पाच पाटील टीम तयार केली पाच पाटील टीम मधून कोणीही कोणत्याही गावात निर्भिड, निसंकोच, निस्वार्थी काम करण्यासाठी तयार केले यात शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आपण सगळे आहोत एक भावना तयार केली गेल्या पाच वर्षापासून आम्ही सर्व मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा यामध्ये काम करत आहे बाहेरून लोकांना असे वाटते ही रिकामी लोके आहे यांच्या घरी कामे नाही म्हणून लोकांची धुनी होत आहे पण त्यांना काय माहित आज जे काम करत आहोत यासाठी डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांनी किती मेहनत घेतली व ते प्रत्यक्षात उतरवले आहे. आज मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा हे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले आहे यात शेतकरी वर्ग महत्त्वाचा आहे तो यामध्ये 60% खर्च करतो व 40 % खर्च मिशन टीम करते... तब्बल 59 गावांमध्ये जलसंधारणाचे काम झाले यात जवळपास 400 कोटी लिटर जलसाठा तयार झाला आहे एक प्रेरणादायी उदाहरण आहे यावर्षी मिशन नदी स्वच्छता हे राबवून चाळीसगाव तितूर,डोंगरी नदी हे स्वच्छ करण्यात आली..एक आदर्श मॉडेल महाराष्ट्राला दाखवून दिले.. मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा यातून नवीन संकल्पना, चांगले लोक दररोज रोज भेटत आहे व अनुभवाची शिदोरी वाढत आहे हे केवळ एका संवेदनशील अधिकारी डॉक्टर उज्ज्वलकुमार चव्हाण यांच्यामुळेच...शेवटी
डॉ उज्वल कुमार चव्हाण यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व आपला सहवास व मार्गदर्शन पाच पाटील टीम ला नेहमी मिळत जावो ही एक प्रार्थना ❤🌹🌹🌹❤
प्रा किरण पाटील
Comments
Post a Comment